कागवाड मतदारसंघात शेतकरी कितीही अडचणीत आला तरी आत्महत्येचा विचार करू नका, प्रत्येक समस्येवर उपाय आहे, तुमच्या समस्यांना मी प्रतिसाद देईन, असे आवाहन कागवाड मतदारसंघाचे आमदार राजू कागे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
बुधवारी सकाळी उगार येथील आमदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला नुकसान भरपाईचा धनादेश देताना आमदार म्हणाले की, कोणत्याही शेतकऱ्याने अशी कठोर पावले उचलू नयेत.

कृष्णा- कित्तूर गावातील माणिक कडप्पा पाटील (41 ) याने दिनांक 28/3/2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली या शेतकऱ्याची पत्नी प्रियंका यांना शासनाने मंजूर केलेला 5 लाख रुपये नुकसान भरपाईचा धनादेश आमदार राजू कागे यांनी सुपूर्द केला दिला.
अथणी तालुका कृषी अधिकारी निंगाप्पा बिरादार, कागवाड तालुका सहाय्यक कृषी अधिकारी कांतिनाथ बिरादार यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वाटप करण्यात आले.
साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, काँग्रेस पक्षाचे नेते वसंत कोठे, वीरभद्र कटगेरी, विश्वनाथ पाटील, राजीव मदने, संजय शिंदे, अण्णासाहेब हुलगबळी, आमदारांचे स्वीय सहाय्यक कुमार पाटील, मल्लारी कटकार मंतेश मदने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments