रामदुर्ग तालुक्यातील मुदकवी घाट येथे मक्याची वाहतूक करणारी लॉरी दरीत कोसळल्याची घटना घडली.
रामदुर्ग तालुक्यातील मुदकवी घाटात मका घेऊन जाणारी लॉरी खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. हावेरीहून अथणीकडे मक्याने भरलेली लॉरी जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुदकवी घाटात हा अपघात झाला. सुदैवानेच या अपघातात लॉरी चालक व क्लिनर सुखरूप बचावले. या दुर्घटनेची नोंद रामदुर्ग पोलीस ठाण्यात झाली आहे.


Recent Comments