धारवाड येथील नवलगुंद रोडवर दुचाकी आणि क्रूझर वाहन यांच्यात भीषण अपघात झाला असून त्यात वीसहून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
नवलगुंद येथून फटाके घेण्यासाठी धारवाडकडे दुचाकीवरून निघालेल्या दुचाकीस्वारांना समोरून येणाऱ्या क्रुझर वाहनाची धडक बसल्याने हा अपघात झाला. 20 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील जखमींना धारवाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धारवाड येथील शिवाजी सर्कलजवळील परिसरातील रहिवासी दुचाकीने जात होते . . हे दोघे मद्यधुंद अवस्थेत निघाले असता त्यांना क्रूझरला धडक बसली. त्यामुळे दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
क्रूझर वाहनात वीस पेक्षा जास्त मजूर असून ते सर्व नवलगुंद तालुक्यातील हनसी, हेब्बाळ आणि बल्या येथील असल्याची माहिती आहे. घटनास्थळी शिवल्ली व मरडगी गावातील काही लोकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले.


Recent Comments