Belagavi

अश्विन शिंदे यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी नेमणूक

Share

बेळगाव येथील हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन एम शिंदे यांची शहर विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदी सरकारी आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांनी नुकताच अतिरिक्त कार्यकारी अभियंतापदाचा पदभार स्वीकारला आहे.

अश्विन शिंदे यांनी यापूर्वी सेक्शन ऑफिसर तसेच शहरातील तिन्ही विभागात उपविभाग अधिकारी म्हणून प्रामाणिकपणपणे काम केले आहे. तसेच केपीटीसीएल 220 बेळगाव स्टेशनमध्ये देखभाल विभागात काम केले आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवात त्यांनी अखंडपणे विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी जातीने सक्षमपणे काम केले असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Tags: