बेळगाव तालुक्यातील गजपती गावात उच्चउच्चवर्णियांनी दलित कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बेळगाव तालुक्यातील गजपती गावात काल रात्री उशिरा एका दलित कुटुंबावर उच्चउच्चवर्णियांनी हल्ला केला. डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाने या घटनेचा निषेध केला असून, आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. फ्लो
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून गावात शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन केले.
या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर गजपती गावात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावात ग्रामीण एसीपी, काकती सीपीआय विजयकुमार सिन्नूर यांनी तळ ठोकला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


Recent Comments