Belagavi

आ. अभय पाटील यांचा प्रभाग 53, 54 मध्ये सायकलवरून पाहणी दौरा

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज बेळगाव दक्षिण मतदार संघात येणाऱ्या प्रभाग क्र. 53 व 54 मध्ये सायकलवरून समस्यांचा पाहणी दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

गेल्या सुमारे 5 वर्षांपासून आमदार अभय पाटील यांनी थेट जनतेला भेटून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या हेतून सायकलवरून पाहणी दौरा काढण्याचा उपक्रम दक्षिण मतदार संघात राबवला आहे. त्याला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रहिवाशी आपल्या विविध समस्या आ. पाटील यांच्याकडे थेट मांडून त्यांचे निवारण करण्याची विनंती करत असून, त्याला प्रतिसाद देत आ. अभय पाटील समस्यांचे निराकरण करत आहेत.

असा उपक्रम राबविणारे ते बहुधा कर्नाटकातील एकमेव आमदार असावेत. सध्या दिवाळी सण सुरु असला तरी आ. अभय पाटील यांनी बेळगाव मनपाच्या हद्दीतील प्रभाग क्र. 53 व 54 मध्ये नगरसेवक व कार्यकर्त्यांसह सायकलवरून फिरून समस्यांचा आढावा घेतला. यावेळी रहिवाशांनी त्यांना भेटून आपल्या विविध नागरी समस्या सांगून त्या सोडविण्याची विनंती केली. त्याला आ. अभय पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.

यावेळी इन न्यूजशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, गेल्या 5 वर्षांपासून मी मतदार संघातील प्रभागांमध्ये सायकल दौरा काढून समस्या सोडविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रहिवाशांच्या समस्यांना प्रतिसाद देत त्या सोडवीत आहे. अशाप्रकारे मतदार संघातील सुमारे 97% समस्या सोडविल्या आहेत. उर्वरित 3% समस्या येत्या 6 महिन्यात सोडविण्यात येतील. आज नगरसेवक राजू मैलगोळ आणि माधवी राघोजी यांच्या प्रभाग क्र. 53 व 54 मध्ये सायकलवरून समस्या पाहणी दौरा काढला आहे. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे. नागरिकांनीही कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गाडीकडे देऊन आपली जबाबदारी पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले

यावेळी दोन्ही प्रभागातील नागरिकांनी आ. अभय पाटील यांच्याकडे विविध नागरी समस्या मांडून त्या सोडविण्याची विनंती केली. यावेळी नगरसेवक रमेश मैलगोळ, समाजसेवक सारंग राघोजी यांच्यासह आ. अभय पाटील यांचे समर्थक, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

Tags: