Banglore

काँग्रेसच्या 40 हून अधिक असंतुष्ट आमदारांचे नाराजी पत्र : गोविंद कारजोळ

Share

काँग्रेसच्या 40 हून अधिक असंतुष्ट आमदारांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांनी केलाय.

काँग्रेसच्या 40 हून अधिक असंतुष्ट आमदारांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले असून त्यात बी. आर. पाटील-आळंद, धारवाड ग्रामीणचे विनय कुलकर्णी, बसवराज रायरेड्डी आणि इतर अनेकांचा समावेश आहे. त्यांनी सिद्धरामय्या यांच्या सरकारविरोधात नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी, तुमच्या सरकारमध्ये एक रुपयाचे अनुदान दिले जात नाही, विकास कामे होत नाहीत.

त्यामुळे आमच्या मतदारसंघात लोक आम्हाला फटकारतात. लोकांना तोंड दाखवण्यासाठी आम्हाला जागा नाही. आमच्या मतदार संघाचे अनुदान तत्काळ जारी करा, तसेच आम्हाला आवश्यक असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांत कोणतेही सरकार असे बॅकफुटला आले नव्हते, त्याचे नाव वाईट झाले नाही. पण हे सरकार पूर्णत: निष्क्रिय बनले आहे. दुष्काळी व्यवस्थापन आणि जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकारला पूर्ण अपयश आल्याने त्यांनी जे बोलले ते करून दाखवा किंवा खुर्ची रिकामी करा, अशी मागणी कारजोळ यांनी केली आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #Belagavi# state #Govind Karjolla