Belagavi

बजाज कंपनीच्या ‘क्यूटी’ ऑटो टॅक्सीचे बेळगावात शानदार अनावरण

Share

भरवसा म्हणजे बजाज कंपनी आहे. बजाज ऑटो देशातील सुमारे 75 लाख लोकांच्या जीवनात आर्थिक स्रोत म्हणून काम करत आहे असे, बजाज कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक राघवेंद्र ए. यांनी सांगितले.

बजाज कंपनीचे नाव ऑटोमोबाईल क्षेत्रात देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे, त्यांनी उत्पादित केलेले कोणतेही वाहन ग्राहकांच्या पसंतीस उतरते. मध्यमवर्गीय लोकांना कुटुंबासह फिरता यावे या उद्देशाने आणखी एक नवीन वाहन कंपनीने बाजारात आणले आहे. हे वाहन अल्पावधीतच ग्राहकांना आकर्षित करत आहे. बेळगावात एका खासगी हॉटेलमध्ये ‘क्यूटी’ नावाच्या ऑटो-टॅक्सीचा शानदार अनावरण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे सहाय्यक आरटीओ महंमद गौस यांच्या हस्ते ‘क्यूटी’चे अनावरण करण्यात आले.

यावेळी बोलताना बजाज ऑटोचे प्रादेशिक व्यवस्थापक राघवेंद्र ए. म्हणाले की, बेळगाव हे बेंगळुरूसारखे वाढणारे महानगर बनले आहे. पर्यावरणासाठी योग्य आणि आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी बजाज कंपनीची क्यूटी ऑटो-टॅक्सी आऊटलेट्स राज्यातील फक्त 4 भागात दिली जातात. केवळ बेंगळुरू, मंगळूर, उडुपी आणि बेळगाव येथील आऊटलेट्सना परवाना देण्यात आला आहे. भारतातील प्रत्येक घरात बजाज कंपनीचे एक ना एक उत्पादन आहे. बजाज हे भारतीय घरातील सदस्यासारखे आहेत. कंपनीने ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील ऑटो-टॅक्सी क्यूटी फक्त 3.65 लाख रुपयात उपलब्ध केली आहे. ती घेऊन आर्थिकदृष्ट्या सुदृढ बनण्याचा सल्ला दिला.

पीरजादे ऑटोमोबाईल्सचे मालक ए. एस. पीरजादे म्हणाले की, क्यूटी ऑटोटॅक्सी चालकासाठी अनुकूल आहे. त्यातून अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होईल. ऑटो आणि ऑटो-टॅक्सीमध्ये खूप फरक आहे. बेळगावच्या पावसापासून बचाव करण्यासाठी ऑटो विकत घेतला की, त्याला पुन्हा साहित्य जोडावे लागते. पण या ऑटो-टॅक्सीला त्याची गरज नाही. कारसारखी दिसणारी क्यूटी ऑटो-टॅक्सी बेळगावकरांचे लक्ष नक्कीच वेधून घेईल, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना सहाय्यक आरटीओ महंमद गौस यांनी पीरजादे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आणि सर्व ग्राहकांना वाहतुकीचे नियम पाळून वाहने जपून चालवण्यास सांगितले.

राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुक्तार पठाण म्हणाले की, पीरजादे कुटुंबाने हे बजाजचे नवीन वाहन क्यूटी राज्याच्या दुसरी राजधानी असलेल्या कुंदानगरीत आणले हे बेळगावचे भाग्य आहे. मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांनी, पीरजादे यांच्या कुटुंबीयांना मराठा सहकारी बँक सर्व सहकार्य करेल असे सांगून, त्यांनी आपल्या भागात एवढ्या मोठ्या शोरूमची स्थापना केल्याचा आनंद असल्याचे सांगून पीरजादे यांना अधिकाधिक समाजसेवा करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी केव्हीजी बँकेचे अधिकारी एम. रंगप्पा, मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी, कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #Belagavi# pirazade #showroom #grand #opening #cmrcl