Belagavi

4 लाखांच्या साड्या चोरीप्रकरणी 6 महिलांसह 8 आरोपींना शिर्डीत अटक

Share

ग्राहकांच्या वेशात साडीच्या दुकानात येऊन महागड्या साड्या घेण्याचा बहाणा करून साड्या चोरणाऱ्या सहा महिला व दोन पुरुषांना बेळगाव येथील खडेबाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे.

बेळगावातील खडेबाजारमधील वीरूपाक्षी सिल्क अँड सारीज या प्रसिद्ध साडी दुकानातून 3 नोव्हेंबर रोजी चार लाखांच्या महागड्या साड्या चोरीला गेल्या होत्या. एकाच वेळी सहा महिला ग्राहक बनून खरेदीच्या बहाण्याने या दुकानात आल्या आणि महागड्या साड्या घेण्याचा बहाणा करून पाच महागड्या साड्या चोरल्या.
अशा प्रकारे साड्यांची बंडले पिशवीत ठेवताना ती सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून साडीने झाकण्यात आली. चोरीचा कार्यभाग साधताच महिलांनी दुकानाबाहेर येऊन पळ काढला होता.

यानंतर दुकानमालकाने खडेबाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे साड्या चोरणाऱ्या टोळी महाराष्ट्रातील शिर्डी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वेगाने हालचाल करत पोलिसांनी शिर्डी येथे जाऊन दोन पुरुष व सहा महिला अशा एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व चोरटे आंध्रप्रदेशमधील आहेत. सुनीता इटा (वय 45), कनकदुर्गा चडल (वय 36), राणी मत्तापर्थी (वय 33), मणि देवरकोंडा (वय 39), रजनी मेचरप्पू (वय 30), चुकम्मा पोन्ना (वय 50), व्यंकटेशराव कनुमुरी (वय 41), वेंकटेशरावलू उसरुगंती (वय 34) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Tags: