बेळगावातील बबन भोबे मित्रमंडळ आणि स्वामी विवेकानंद रिक्षा स्टँड, गोंधळी गल्ली यांच्यातर्फे खास दिवाळीनिमित्त परिसरातील शालेय विध्यार्थी आणि अनाथ मुलांना सुगंधी तेल, साबण आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

भाजप ओबीसी राज्य मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव, संदीप चौगुले, सुहास चौगुले, टी. के. मंडोळकर आणि एस. एल कदम यांच्याहस्ते शालेय विध्यार्थी आणि अनाथ मुलांना सुगंधी तेल, साबण आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. मराठी शाळा नं. २२, कन्नड शाळा नं. ९, समृद्धी फौंडेशन, अमरीसप्पा, शारीरिक अपंग संस्था येथील २०० मुलांनी याचा लाभ घेतला.
प्रारंभी बबन भोबे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी किरण जाधव, टी. के. मंडोळकर व शीला शिरूर यांची भाषणे झाली. कार्यक्रमात कठीण परिस्थितीतून बीई शिक्षण पूर्ण करून आता बेंगळूर येथे नोकरी करत असलेल्या शीला शिरूर हिचा किरण जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी स्वामी विवेकानंद रिक्षा स्टॅन्ड मंडळाचे कार्यकर्ते दौलत मोरे, जोतिबा अष्टेकर, श्रीकांत खामकर, राजू खादरवाडकर, मंदा नेवगी आदी उपस्थित होते.


Recent Comments