महिला व बालविकास, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण खात्याचे मंत्री आणि उडुपी जिल्ह्याच्या पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड आणि उडुपी या किनारपट्टी जिल्ह्यांच्या मत्स्यव्यवसाय, बंदर आणि जलवाहतूक विभागांशी संबंधित विभागीय समस्यांवरील सल्लामसलत बैठकीत भाग घेतला.

बेंगळूरमधील विधानसौधच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मंत्री लक्ष्मीहेब्बाळकर यांनी बैठक घेतली.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर, आरोग्य मंत्री तथा दक्षिण कन्नड जिल्हा पालकमंत्री दिनेश गुंडूराव, बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उत्तर कन्नड जिल्हा पालकमंत्री मंकल वैद्य, किनारपट्टीचे आमदार दिनकर शेट्टी, उमानाथ कोट्यान, शिवराम हेब्बार, गुरुराज गंटीहोळे, यशपाल सुवर्ण, वेदव्यास कामत, सतीश सैल, हरीश पुंजा, विधान परिषद सदस्य प्रतापसिंहा नाईक आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव एल. के. अतिक आदी उपस्थित होते.


Recent Comments