विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या सदस्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या सदस्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी जोरदार आंदोलन केले. शासनाने राज्यातील शोषित वर्गासाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवून भटक्या-अर्धभटक्या जमातींना मूलभूत सुविधा उपलब्ध करून
द्याव्यात, कर्ज मंजूर करावे, अतिक्रमण केलेल्या जमिनीचा मालकी हक्क द्यावा, बिगर हुकूम जमीन कसणाऱ्यांना हक्क द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments