बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील आंबेडकर नगरजवळ चोरट्यांनी एसबीआयचे एटीएम फोडून लाखो रुपयांवर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

चिक्कोडी येथील आंबेडकर नगर येथील एसबीआयच्या एटीएममधून २० लाखांहून अधिक रक्कम चोरीला गेली. कारमध्ये आलेल्या चौघांनी हा गुन्हा केला. कटरने एटीएम कापून आतील रोकड घेऊन चोरटे फरार झाले आहेत . एटीएममध्ये किती पैसे होते याची माहिती बँक कर्मचारी आणि पोलीस गोळा करत आहेत. तसेच, दुसरीकडे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एटीएममधून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. चिक्कोडी पोलीस आणि एफएसएलच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .


Recent Comments