एटीएम मशीन गॅस कटरने कापून रोकड चोरीची घटना विजयपूर तालुक्यातील शिवणगी गावात इंडिया वन एटीएममध्ये घडली.
विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक रायगोंडा जनार व त्यांच्या कर्मचार्यांनी अज्ञात चोरट्यांनी हे कृत्य केलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एटीएमच्या सीसी कॅमेऱ्यावर रंग फवारून 3.60 लाख रुपये ऐवज चोरून नेले . याप्रकरणी विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.


Recent Comments