Banglore

सतीश जारकीहोळींशी गुप्त चर्चा करून डीकेशि दिल्लीला रवाना

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सतीश जारकीहोळी आणि परमेश्वर यांच्यासोबत नुकतीच गुप्त बैठक घेतली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आज सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन गुप्त बैठक घेतली आणि तेथून थेट दिल्लीला प्रयाण केले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

डीके शिवकुमार यांनी काही कारणास्तव गैरहजर असलेले मंत्री सतीश जारकीहोळी यांची वैयक्तिक भेट घेतली आणि गोपनीय चर्चा केली. नंतर ते थेट दिल्लीला जाण्यासाठी केम्पेगौडा विमानतळावरून रवाना झाले. बेळगावच्या राजकारणात सतीश जारकीहोळी यांची नाराजी असताना डीके शिवकुमार यांच्या दौऱ्याने उत्सुकता वाढली आहे.

गेल्या आठवड्यात सीएम सिद्धरामय्या यांच्या परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या डिनर मीटनंतर सतर्क झालेल्या डीके शिवकुमार यांनी मंत्री एचसी महादेवप्पा आणि सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली आणि चर्चेद्वारे अंतर्गत गोंधळ सोडवण्याचा निर्णय घेतला. सतीश जारकीहोळी यांनी 2028 मध्ये मुख्यमंत्रीपद मागणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. यातून जारकीहोळी यांनी आपणही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा संदेश दिलाय. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश जारकीहोळी आणि डीके शिवकुमार यांच्या भेटीला महत्त्व आले आहे.

डीके शिवकुमार यांच्या भेटीबद्दल सतीश जारकीहोळी यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी आणि डीसीएम डीके शिवकुमार यांनी राजकीय विषयावर चर्चा केली. पक्ष संघटना, खासदार निवडणूक, जिल्हाध्यक्ष बदलाबाबत बोलले आणि बेळगावच्या प्रश्नावर बोलण्यासारखे काहीच नाही, असे स्पष्ट केले.

केपीसीसीचे कार्यकारी अध्यक्ष आणि काही जिल्हाध्यक्षांना बदलण्याच्या व इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार दिल्लीला गेले आहेत, जिथे ते एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतील आणि चर्चा करतील असे ते म्हणाले. बाइट
एकंदर, दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी डीके शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळी यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags: