Chikkodi

उसाचे दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे आंदोलन

Share

उसाचे दर जाहीर न करता साखर कारखाने सुरू केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याची घटना निपाणी शहरात घडली.

काही साखर कारखाने उसाला भाव जाहीर न करता सुरू झाले आहेत.याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभासदांनी उसाने भरलेले ट्रॅक्टर अडवून गतवर्षीच्या उसाव्यतिरिक्त प्रतिटन 400 रुपये अधिक भाव देण्याची मागणी करत आंदोलन केले.

यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस पुरेसा वाढला नाही.उत्पादनही फारसे झाले नाही. कारखान्यांनी तातडीने ऊस पिकाला जादा भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Chikodi#Nippani# Farmer #Protest