Dharwad

धारवाडमध्ये शॉर्टसर्किटमुळे घराला आग, फ्रीज, टीव्ही संच जळून खाक

Share

शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरातील कपडे, टीव्ही, फ्रीज व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना धारवाडमध्ये घडली आहे.

सुलेमान मोरब यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली. सर्व कुटुंबीय गावी गेले असताना ही घटना घडली. आगीमुळे घरातील फ्रीज, टीव्ही आदी वस्तू जळून खाक झाल्या.

गरग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या आगीत सुलेमान मोरबने आपल्या मुलीच्या लग्नासाठी आणलेले कपडेही जळून खाक झाल्याने सुलेमानचे नुकसान झाले.

Tags: