कबड्डी हा खेळ भारताच्या अनेक भागात लोकप्रिय आहे आणि कबड्डीला भारतातील ऐतिहासिक खेळांमध्ये सर्वोत्तम स्थान आहे. कबड्डी हा खेळ प्रामुख्याने धैर्य, बळ आणि सहकार्य, जिद्द आणि मनोबल वाढवणारा आहे. असे खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले .


चिक्कोडीच्या खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते शनिवारी शहरातील भोजराज स्टेडियमवर , खासदार करंडक महिला व पुरुष स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या प्रदेशातील खेळाडूंना त्यांच्या उच्च विकासासाठी चांगल्या संधी उपलब्ध करून दिलाय आहेत . त्यांनी या संधीचा फायदा घेऊन , पुढे जावे असे ते म्हणाले .
या स्पर्धेत 15 महिला संघ सहभागी झाले आहेत तर 64 पुरुष संघ सहभागी झाले आहेत. ते म्हणाले की, महिलांच्या अंतिम सामन्यात शहरातील बनजवाड पीयू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
नेते अनिल देशपांडे, उमेश बोंतडकर, मुरगेश कुमठल्ली, सिद्धप्पा मुदकन्नवर, नानासाहेब अतवाडे , आप्पासाहेब अतवाडे, गिरीश बुटाले, डॉ.रवी संक , नानासाब अतवाडे , मुत्तण्णा संक , अण्णासाब नाईक, मलकू आंदानी, सनदी पाटील, यांच्यासह लोकनेते व मान्यवर उपस्थित होते


Recent Comments