Belagavi

अंजनेय नगरात खाद्यप्रेमींना स्वादिष्ट भोजन देण्यासाठी हॉटेल रासाचे उद्घाटन

Share

अंजनेय नगर, बेळगाव येथे खाद्यप्रेमींना कुटुंबासह स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी “हॉटेल रासा” या नवीन हॉटेलचे शानदार समारंभात भव्य उद्घाटन करण्यात आले.

कुंदानगरी बेळगावातील अंजनेय नगर येथे नवीन रासा हॉटेलचे आज रविवारी शानदार उदघाटन करण्यात आले. यानिमित्त विशेष महागणपती, लक्ष्मी पूजन होम हवनाचे आयोजन करण्यात आले होते. कुंदरगी येथील श्री आडवी सिद्धेश्वर मठाच्या अमर सिद्धेश्वर श्रींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. आमदार राजू शेठ यांनी खास हजेरी लावून रासा हॉटेलचे मालक प्रभू पट्टेद आणि मधुसुदन यांना शुभेच्छा दिल्या. मालक प्रभू पट्टेद आणि मधुसुदन यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थित राहून पूजेत भाग घेतला. फळे व पुष्पगुच्छ अर्पण केले आणि आनंदाने हॉटेलला उच्च स्तरावर वाढवण्याच्या शुभेच्छा दिल्या. फ्लो
करवे संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगेनट्टी यांनी इन न्यूजशी बोलताना सांगितले की, बेळगावात आज हॉटेल रासा हे स्वादिष्ट आणि वेगळ्या शैलीचे खाद्यपदार्थांची सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू झाले आहे. ग्राहकांच्या पसंतीला ते नक्की उतरेल. बाइट
यावेळी मंजुनाथ म्हणाले की, आमच्या मित्रांनी महांतेश नगरमध्ये रासा नावाचे हॉटेल सुरू केले आहे, या भागात इतके मोठे हॉटेल नाही. या व्यवसायात त्यांना यश येवो अशा शुभेच्छा दिल्या.


उद्योजक अनिल पाटील यांनी सांगितले की, रासा नावाचे हॉटेल आज सुरू झाले असून त्याचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले आहे. कुटुंबासोबत व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. हॉटेलचे इंटीरिअर खूप चांगले आहे. खाद्यप्रेमींना कुटुंबासह एकत्र जेवण्याचा आनंद येथे मिळेल. बेळगावकरांनी येथे एकदा अवश्य भेट द्यावी ही विनंती.

विद्या पाटील यांनी सांगितले की, आशा पाटील आणि अनिल पाटील आम्ही सर्व मित्र आहोत, आशाच्या नातेवाईकांनी आमच्या परिसरात एक मोठ्या लेव्हलचे रेस्टॉरंट सुरू केले आहे, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या परिसरातील प्रत्येकाने कुटुंबासह या रेस्टॉरंटमध्ये यावे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घ्यावा. बाईट
आशा पाटील यांनी, आज आमचे भाऊ प्रभू पट्टेद यांनी बेळगावात एवढं मोठं हॉटेल सुरू केलं आहे रासा हॉटेल हे बेळगावमधलं सर्वात मोठं हॉटेल आहे. येथे उच्च दर्जाची सेवा, खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेळगावकर खवय्यांनी येथे एकदा जरूर भेट देऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उद्योजक अनिल पाटील, विद्या पाटील, आशा पाटील, मंजुनाथ आदींसह अनेकांनी उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला.
ली रेस्टॉरंट

Tags: