त्या विकृत तरुणावर कारवाई करा, आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा देत युवतींच्या गटाने खानापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. काय आहे हे प्रकरण म्हणताय, तर मग पहा हा वृत्तांत…

खानापूर तालुक्यातील लोकोळी येथील ही घटना. एका तरुणाकडून इंस्टाग्रामवर लोकोळी गावातील तरुणींचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो टाकून त्यांची बेअब्रू करण्यात आली. अशा प्रकारची कृत्ये वारंवार करणाऱ्या या तरुणाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगून संबंधित युवतीची समजूत काढण्यात आली. परंतु चार दिवसांपूर्वी ही घटना पुन्हा घडली आहे. त्यामुळे बिनधास्त फिरणाऱ्या तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकल्याने संबंधित तरुणी मानसिकदृष्ट्या खचली होती. ते पाहून गावातील तरुणींच्या गटाने अन्यायाविरोधात तक्रार करूनही पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली नाही. त्यामुळे या युवतींच्या जमावाने काल संध्याकाळी गावकऱ्यांसोबत खानापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आम्हाला न्याय द्या अशी मागणी करून कैफियत मांडली.
या संदर्भात बोलताना स्थानिक महिलांनी सांगितले की, आमच्या प्रतिष्ठेचा लिलाव करणार्या तरुणाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे त्याच्या घरचे सांगतात. पण तो बरा असल्याची माहिती युवतींनी पोलिसांनी दिली. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्याला अटक केली.
न्यायासाठी तरुणींच्या एका गटाने पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढून त्यांच्या इज्जतीला धोका निर्माण करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या रोडरोमिओला चांगलाच धडा शिकवला आहे.


Recent Comments