आपल्या जडणघडणीत समाजाचे योगदान असते. त्यामुळे आपण समाजाचे देणे लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकानं वागलं पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ लेखिका आशा रतनजी यांनी केले.
बेळगावातील रामनगरातील विद्याधिराज भवनात रविवारी उन्नती ट्रस्टतर्फे “शक्तिसंचय” जागृत महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन केल्यावर त्या बोलत होत्या.
लेखिका आशा रतनजी पुढे म्हणाल्या की, धनप्राप्ती हे प्रत्येकाचे उद्दिष्ट, स्वप्न असते. ते जरूर पूर्ण करावे पण चांगल्या मार्गाने पैसे कमावून. आपल्या कमाईतील काही भाग समाजातील गरजुंना दिला पाहिजे. वाईट मार्गाने पैसे कमावले तर कदाचित स्वतःला त्रास होणार नाही, पण आईवडिलांचे पाप मुलांच्या वाट्याला येते. स्वतःचा त्रास एकवेळ सहन करता येईल, मात्र मुलांचा त्रास कोणालाही बघवत नाही. त्यामुळे सन्मार्गाने धनप्राप्ती केली पाहिजे. देव दिसत नसला तरी तो सतत आपल्यासोबत असतो. हीच भावना माणसाला जगण्यास बळ देते. निसर्ग, पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. अग्नी, वायू, पृथ्वी, जल, आकाश या पंचमहाभूतांची पूजा केली पाहिजे, त्यांचा गैरवापर, हेळसांड करून त्यांना क्रोधीत करू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बालपणी राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून मिळालेल्या संस्कारांची आठवण सांगितली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शक्तिसंचय जागृत महिला संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पुणे येथील महिला संघटनेच्या अ. भा. सहसंयोजिका भाग्यश्री उर्फ चंदा साठे यांचे बीजभाषण झाले. संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
संमेलनात महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, खासदार मंगल अंगडी, डॉ. ज्योती तुक्कार, डॉ. गुरुदेवी हुलेप्पन्नावर, मोनिका सावंत, सुजाता जाली, विद्या मुरकुंबी, नीना काकतकर, नीलगंगा चरंतीमठ, डॉ. मंजुश्री गिजरे, सरिता पाटील, नीलिमा झंवर, रत्नप्रभा बेल्लद, मंगला मठद, स्वरूपा इनामदार, भाविका होनगेकर, मधुरा भातकांडे, शारदा पै, लतिका बिळगी, सरस्वती सुळेभावी, माधुरी कुलकर्णी, सौम्या कित्तूर, आरती पासलकर, पल्लवी पदकी आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.


Recent Comments