मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट मिटिंगवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात उपटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तशातच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या बैठकीचे आपल्यालाही निमंत्रण होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकलो नाही असे म्हटले आहे.
बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यानी आज आयोजित केलेल्या ब्रेकफास्ट मीटिंगचे निमंत्रण आपल्यालाही होते, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाऊ शकलो नाही असे सांगितले. गेल्या ३-४ दिवसांपासून माझी प्रकृती बरी नाही, त्यामुळे विश्रांती घेत आहे. माझ्यासाठी आरोग्य महत्वाचे आहे, त्यानंतर राजकारण. उद्या सायंकाळी बेंगळूरला जाणार आहे. तेथे गेल्यावर पाहू, चर्चा करेन असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments