Belagavi

काकती येथे समाजकंटकांनी हॉटेलला लावली आग; सुमारे लाखाचे नुकसान

Share

गरीब परिस्थिती असलेल्या बेरोजगार युवकाने सुरु केलेल्या हॉटेलला अज्ञात समाजकंटकानी आग लावून पेटवून दिले. ही संतापजनक घटना काकती येथे घडली.

काकतीमध्ये एका टी स्टॉलला अज्ञातांनी आग लावून पेटवून दिले. काकती येथील भावकाई गल्लीतील रहिवासी नागराज वीरभद्र अमाशी यांनी ९ वर्षांपूर्वी बेरोजगारीमुळे त्रस्त होऊन एक छोटेसा टी स्टॉल सुरु केला होता. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालू होता आई व मुलगा याने हे हॉटेल उदरनिर्वाहासाठी चालू केले होते. त्या हॉटेलवरच त्यांचे घर चालत होते. पण काल रात्री अज्ञात समाजकंटकानी डिझेल टाकून हा टी स्टॉल पेटवून दिला. त्यामध्ये त्यांचे जवळजवळ एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. फ्लो
याबाबत इन न्यूजला माहिती देताना नागराज व त्यांच्या आईने सांगितले की, आमची घरची परिस्थिती बेताची आहे.

त्यामुळे आम्ही ९ वर्षांपूर्वी हे छोटे हॉटेल सुरु केले होते. यातून मिळणाऱ्या नफ्यातच आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. काल, शुक्रवारी दुपारी आम्ही हॉटेल बंद करून गेलो होत. त्यानंतर रात्री उशिरा अज्ञातांनी आमच्या हॉटेलच्या दरवाजातून डिझेल ओतून आग लावून दिली. आगीत हॉटेलमधील खुर्च्या, टेबल, बॅरेल, मिक्सर आदी साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे आमचे लाखाचे नुकसान झाले आहे. आज सकाळी दुसऱ्यांकडून आम्हाला याची माहिती मिळाली. ग्रामपंचायत किंवा सरकारने आम्हाला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. दरम्यान, या आगीत हॉटेलमधील सिलेंडरच्या टाकीन पेट घेतला नाही हे सुदैव म्हणावे लागेल अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Karnataka #Anti-social #Fire #Hotel #Loss