बेळगावमधील प्रतिष्ठित यश हॉस्पिटलमध्ये पीसीपीएन डीटी कायदा तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शन तत्वांचे उल्लंघन होत असल्याच्या माहितीवरून , एसी श्रावण नाईक , प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी शुभम शुक्ला तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून , अल्ट्रासाऊंड मशीन जप्त करून , त्या युनिटला टाळे ठोकले
सरकारने कडक कायदा करून देखील अजूनही लपूनछपून काही हॉस्पिटलमध्ये भ्रूणलिंगनिदान केले जात आहे . स्त्री भ्रूणहत्या केली जात आहे . प्रतिष्ठित हॉस्पिटल्समध्ये मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळून हे बेकायदेशीर कृत्य केले जात आहे . या प्रकरणी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने कारवाई सुरु केली आहे . शहरातील प्रतिष्ठित यश हॉस्पिटलमध्ये एसी श्रावण नाईक, आयएएस अधिकारी शुभम शुक्ला आणि कल्याण अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून , अल्ट्रा साउंड स्कॅनिंग मशीनसहित त्या विभागाला टाळे ठोकले .
या संदर्भात एसी श्रावण नाईक यांनी इन न्यूजला सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास आमचे कुटुंब कल्याण अधिकारी आणि आयएएस अधिकारी शुभम शुक्ला यांनी यश हॉस्पिटलला अचानक भेट दिली आणि पीसीपीएन डीटी कायद्याच्या अधिकाराखाली अल्ट्रासाऊंड मशीनची तपासणी केली.
आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. उल्लंघनाच्या आधारे, आम्ही आज स्कॅनिंग मशीन आणि तो विभाग सीझ केला आहे . , ओपीडी रजिस्टर आणि कागदपत्रे तपासली आहेत जेव्हा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळले तेव्हा आम्ही ही कारवाई केली , असे ते म्हणाले.
बेळगाव शहरात अशी अनेक रुग्णालये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.शासनाच्या अधिकारानुसार सर्व रुग्णालयांची तपासणी करू.
यावेळी बेळगाव पीसीपीएन डीटी नोडल अधिकारी डॉ.विश्वनाथ भोवी, आरोग्य अधिकारी मंजुनाथ बिसनल्ली,
हालप्पा वडेयर, विजय आदींसह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments