नेहरूनगर येथील बसवणा मंदिर नजीक गेल्या काही दिवसांपासून गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे . वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना तसेच परिसरातील दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे . मात्र या समस्येकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून , जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .
नेहरू नगरातील या रस्त्यावरून ,वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरु असते . या ठिकाणी गटारांचे बांधकाम तर करण्यात आले मात्र याप्रमाणे , सीडी बांधकाम करण्यात आलेले नाही . सीडी ची उंची कमी असल्याने लहान असल्याने सांडपाणी पुढे वाहून न जाता ते रस्त्यावर वाहत आहे याच सांडपाण्यातून , वाहने तसेच पादचाऱ्यांना दुर्गंधी सहन करीत जावे लागत आहे . कित्येक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे . महानगरपालिकेकडून गटारांची स्वच्छता करण्यात येते मात्र , त्या नंतर तीच परीस्थिती निर्माण होते.. जोपर्यंत गटाराचे नवीन सीडीवर्क करण्यात येत नाही तोपर्यंत सांडपाणी रस्त्यावरच वाहत राहणार आहे .
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौघुले यांनी इन न्यूजशी बोलताना , शहरातील मुख्य रस्त्यावरील ही सांडपाण्याची समस्या गेल्या कित्येक दिवसांपासूनची असल्याचे सांगितले . ही समस्या तातडीने दूर करून , या भागातील नागरिक , दुकानदार , फळ विक्रेते , भाजी विक्रेते , वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना अनुकूल करून देण्याचे आवाहन केले आहे .
एकंदर नेहरूनगर भागात रस्त्यावर वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून , रोगराईचा भीती देखील वाढली आहे . प्रशासनाने तातडीने ही समस्या दूर करावी अशी मागणी या भागातील जनता करीत आहेत .


Recent Comments