बेळगावात काळा दिवस साजरा केल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

१९५६ च्या भाषावार प्रांतरचनेत मराठी बहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ भाषिक सीमावासीयांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दरवर्षी एक नोव्हेंबरला बेळगावसह संपूर्ण सीमाभागात काळा दिन साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आज बेळगावसह सीमाभागात काळा दिन गांभीर्याने पाळण्यात आला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाला परवानगी देणार नसल्याचे कर्नाटकी अधिकाऱ्यांनी ठासून सांगितले होते. मात्र काहीही झाले तरी भव्य सायकल फेरी काढून यंदा काळा दिन साजरा करणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खंबीर कार्यकर्त्यांनी केला होता.त्यानंतर एका रात्रीत कार्यकर्त्यांनी सायकल फेरीचे नियोजन केले. बुधवारी सकाळी बेळगावात सायकल फेरी काढून मराठी भाषिकांवरील अन्यायाचा तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रकरणी समितीचे माजी आमदार , माजी महापौर आणि दोन विद्यमान नगरसेवकांसह 18 जणांवर
बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .काळ्या दिनाच्या सायकल फेरीत , बेळगाव, बिदर, भालकी, निप्पाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्याने, पोलिसांनी त्यांच्यावर देशद्रोही घोषणा दिल्याचा ठपका ठेवत , गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मालोजीराव अष्टेकर , मनोहर मनोहर किणेकर ,, रणजित चव्हाण पाटील , सरिता पाटील, सारिका पाटील, अमर यल्लूरकर प्रकाश मरगाळे रवी साळुंके, अंकुश केसरकर यांच्यासह १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


Recent Comments