Banglore

गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर रक्कम करावी वितरित : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

कर्नाटक सरकारच्या बहुप्रतिक्षित योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर रक्कम वितरित करण्यात यावी . तांत्रिक कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरीत पैसे भरावेत, यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय व्हावे, अशी सूचना महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली आहे.

त्यांच्या विधानसौध येथील कार्यालयात गृहलक्ष्मी योजनेच्या प्रगती आढावा बैठकीला संबोधित करताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या कि , योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी आवश्यक ती सर्व पावले तातडीने उचलण्यात यावी.

विभागाचे उपसंचालक, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी ई-गव्हर्नन्स विभागाच्या सहकार्याने काही तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अंगणवाडी सेविकांच्या सहकार्याने घरोघरी जाऊन नोंदणीतील अडचणी दूर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ऑगस्ट महिन्यात 88 टक्के लोकांचे पैसे भरले असून, सप्टेंबर महिन्यात हळूहळू पैसे दिले जात आहेत. ऑक्टोबर महिन्याची 100 टक्के रक्कम लाभार्थ्यांना द्यावी, असे मंत्री म्हणाल्या

यावेळी विभागीय सचिव डॉ.जी.सी.प्रकाश, संचालक एम.एस. अर्चना, मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ.टी.एच.विश्वनाथ व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav bgm-# #Laxmi hebbalkar#progress#meeting#state