हिंसाचार करून घरे रिकामी करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी या मागणीसाठी धारवाडच्या श्रीरामनगर वसाहतीमधील रहिवाशांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
ही जागा तुमची नसून आमची आहे, असे सांगून गेल्या 30 ते 40 वर्षांपासून आम्ही राहत असलेल्या घरांचे खासगी व्यक्ती अचानकपणे तोडफोड करून नुकसान करत आहेत. यासंदर्भात जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. महिनाभरापूर्वी एका घराचे नुकसान झाले असून आता आणखी तीन घरांचे नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणाचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून जनतेच्या रक्षणासाठी पुढे यावे, अशी मागणी त्यांनी केली.
लोक राहत असलेल्या घरांची तोडफोड करून त्यांचे नुकसान करणे योग्य नाही, जिल्हा प्रशासनाने खासगी व्यक्तींचे रेकॉर्ड तपासावे, गरीब व मध्यमवर्गीय लोक राहत असलेल्या घरांची तोडफोड रोखण्यासाठी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments