Banglore

कर्नाटक बनले आहे काँग्रेसच्या मालकीचे एटीएम : येडियुरप्पा

Share

कर्नाटक हे काँग्रेसच्या मालकीचे एटीएम बनले आहे. त्यासाठी हायकमांडचे नेते कर्नाटकात ठाण मांडून राहिले आहेत. राज्यात विकास कामे ठप्प झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा वेळ वाया जात आहे अशी सडकून टीका करत माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राज्य सरकार व काँग्रेसवर निशाणा साधला.

बेंगळुरातील भाजप कार्यालयात आज पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, दुष्काळ निवारणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान वेळ देत नाहीत या सिद्दरामय्यांच्या आरोपाचा समाचार घेताना, पंतप्रधानांबद्दल अनादराने बोलले तर तुम्हाला कोण जवळ करेल?, त्यांनी आदरपूर्वक पंतप्रधानांना भेटून दोन दिवस बसून चर्चा करण्याचा सल्ला दिला.

सत्तेत येऊन सहा महिने उलटले तरी काँग्रेस सरकार चाकात हवा नसल्याप्रमाणे पुढे सरकलेले नाही. आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर आश्वासनपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सिद्धरामय्या यांची पक्षावर पकड नाही, सरकारवर नियंत्रण नाही. गृहलक्ष्मी योजना अपेक्षेप्रमाणे उद्दिष्ट गाठू शकलेली नाही. राज्याची विकासकामे ठप्प झाली आहेत. मोफत वीज देऊ, असे सांगत त्यांनी दर वाढवले ​​आहेत. मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केलेला नाही. आमदारांच्या दोन कोटींच्या अनुदानाऐवजी पन्नास लाख देण्यात आले आहेत. एसटीएससी योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी दिला जात नाही. तांडा कॉर्पोरेशन, आंबेडकर कॉर्पोरेशन, वाल्मिकी निगमला निधी न दिल्याचा आरोप त्यांनी केला.

दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्याने कृषी पंप संचाचा खर्च उचलावा, असे आदेश ते देणार आहेत. मोफत भेटवस्तू देण्यासाठी पैसे नाहीत, आयटी छाप्यात सरकारचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. हे सरकार लुबाडणूक करणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. 100 कोटी रुपयांनी सरकारचा रंग उघड झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीचे टार्गेट देण्यासाठी सुरजेवाला, वेणुगोपाल कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक हे काँग्रेससाठी एटीएम बनले आहे. काहीही झाले तरी मोदींवर टीका करणे हा सिद्धरामय्या यांचा उद्योग बनला आहे.

केंद्राने राज्याला 5.23 लाख कोटी रुपये दिले आहेत. महामार्ग प्रकल्पांसाठीही अनुदान देण्यात आले आहे. सिद्धरामय्या हे राजकीय कारणांसाठी नरेंद्र मोदींवर टीका करून कालहरण करत आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवर बोलताना, विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीला विलंब झाला आहे. डिसेंबरच्या बेळगाव अधिवेशनापूर्वी निवड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav # Bangloru #Congress# Yeddyurappa