Belagavi

काँग्रेसचे सरकार हवा गेलेल्या चाकाप्रमाणे रुतून बसलेय : भाजप नेते भास्कर राव

Share

सत्तेत येऊन सहा महिने उलटले तरी काँग्रेसचे सरकार हवा गेलेल्या चाकाप्रमाणे रुतून बसले आहे. सत्तेत आल्यानंतर केवळ आश्वासने पूर्ण करण्याचाच प्रयत्न करत आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते भास्कर राव यांनी केली.

बेळगावात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते भास्कर राव म्हणाले की, सत्ताधारी सरकार निवडणुकीत सर्वसामान्यांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले. निवडणुकीच्या काळात काँग्रेस सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या योजनेची पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. गृहलक्ष्मी व महिलांसाठी मोफत बस प्रवास वगळता कोणतीही महत्त्वाची योजना कार्यान्वित झालेली नाही, शक्ती योजनेमुळे बसेसची संख्या घटली, असे ते म्हणाले.

गृह ज्योती योजनेत शासन भेदभाव करत आहे, प्रत्येकाला 200 युनिट वीज मिळत नाही, बांधून 3 वर्षे पूर्ण झालेल्या नव्या घरांना प्रत्येकी 60 युनिट वीज आणि त्याआधीच्या घरांना 200 युनिट वीज मोफत दिली जात आहे. हा भेदभाव का? असा सवाल त्यांनी केला. राज्यात अन्नभाग्य योजनाही पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असा आरोप त्यांनी केला.

सत्तेत येऊन सहा महिने उलटले तरी काँग्रेसचे सरकार हवा गेलेल्या चाकाप्रमाणे रुतून बसले आहे. आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर आश्वासनपूर्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं पक्षावर, सरकारवर नियंत्रण नाही. राज्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. मोफत वीज देऊ, असे सांगत त्यांनी विजेचे दर वाढवले ​​आहेत. मंत्री दुष्काळग्रस्त भागात गेले नाहीत आणि जनतेला दिलासा दिला नाही. दुष्काळ निवारणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळत नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर भास्कर राव म्हणाले की, तुम्ही पंतप्रधानांबद्दल अनादराने बोललात तर तुम्हाला कोण जवळ करेल. ?”

ग्रामीण भागात पाच तास वीज देणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, मात्र सरकार एकच तास वीज देत आहे. पूर्वीच्या आणि आताच्या सिद्दरामय्या यांच्या प्रशासनात खूप फरक आहे. सिद्दरामय्या आता दुर्बल झाले आहेत असा आरोप त्यांनी केला. बाइट
पत्रकार परिषदेला भाजप राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, माध्यम संयोजक शरद पाटील उपस्थित होते.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav #congress#bhaskar Rao