Banglore

आमचे सरकार ५ वर्षे टिकेल, त्यानंतरही सत्तेत येईल : सिद्धरामय्या

Share

काँग्रेस पक्षातील एकही आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज नाही, आमचे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.

कोप्पळ तालुक्यातील बस्सापूर विमानतळावर त्यांनी आज, गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यात पाच वर्षे काँग्रेसचेच सरकार असेल. त्यानंतर निवडणुका झाल्यावरही आमचेच सरकार सत्तेत येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. अडीच वर्षांनी मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या अफवांवर पूर्ण प्रतिक्रिया देण्याचे टाळून मुख्यमंत्री सिद्दरामय्या म्हणाले की, आमचेच सरकार पाच वर्षे टिकेल. कारण आधीच्या भाजप सरकारने राज्याचे दिवाळे काढले. आम्ही सत्तेत आल्यानंतर लगेचच हमी योजना लागू केल्या. आमचा एकही आमदार नाराज नाही, असे विषयांतर त्यांनी केले.

त्याचबरोबर केंद्राला दुष्काळ निवारणासाठी पत्र लिहूनही केंद्र सरकार कर्नाटकाबाबत रस दाखवत नसल्याची तक्रार त्यांनी केली. चार कॅबिनेट मंत्री दिल्लीला गेले तरी पंतप्रधान आणि संबंधित मंत्री भेटीसाठी वेळ देत नाहीत. दुष्काळाचे सावट असताना केंद्र सरकार जनतेला सोयीसुविधा देण्यात राजकारण करत आहे. ते त्यांच्या वाट्याचे अनुदान देत नाहीत. अशा स्थितीत भाजपने दुष्काळाचा अभ्यास सोडून केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी कामाला लागावे. राज्यात त्यांचे 25 खासदार असूनही ते राज्यासाठी काहीच करत नसल्याचा टोला त्यांनी भाजपवर लगावला. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सुरजेवाल आणि एआयसीसीचे सरचिटणीस वेणुगोपाल हे राज्यात असंतोष कमी करण्यासाठी नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येत आहेत. पक्षात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सर्व एकजूट आहोत, असे ते म्हणाले.

दुष्काळात आमदार परदेश दौऱ्यावर जात नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमदार सरकारी खर्चाने प्रवास करत नाही आहेत. ते स्वतःच्या पैशाने सहलीला जात आहेत . दौऱ्यावर जाणे ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. जायला काय हरकत आहे? सहा महिन्यात सरकार पडेल असे यत्नाळ दिवास्वप्न पाहत आहे. आम्ही आमचे काम करू. शेतकर्‍यांची चिंता असेल तर भाजपच्या खासदारांना अनुदान घेऊन येऊ द्या, असा टोला सिद्दरामय्या यांनी लगावला.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav #government #5 years #Siddaramaiah #innews #innewsbelagavi #belgaumnews #belagav #legislature#session#Nitesh patil