Dharwad

धारवाडमध्ये करीअम्मा देवीचा जत्रा महोत्सव थाटात साजरा

Share

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धारवाडमधील कुमारेश्वर नगरचा श्री करीअम्मा देवीचा जत्रा महोत्सव व पालखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

करीअम्मादेवी जत्रा महोत्सवाचा एक भाग म्हणून रुद्राभिषेक व सुवासिनींकडून विशेष पूजा व पालखी सोहळा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम मंदिर परिसरात पार पडले. या जत्रा महोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

धारवाड कुमारेश्वर नगर येथील श्री करीअम्मादेवी जत्रा महोत्सवात श्रद्धा व भक्तिभावाने आलेल्या भाविकांनी देवीची विशेष पूजा करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. करीअम्मा देवी मंदिराच्या आवारात अन्नप्रसाद सेवाही पार पडली.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #dharwad #kariyammadevi #jatra #mahotsava #karnataka