बेळगावातील हनुमान नगर येथील रहिवासी, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुभाषचंद्र मल्लाप्पा मुरनाळ यांचे वार्धक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
हनुमान नगर, बेळगाव येथील रहिवासी, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सुभाषचंद्र मल्लाप्पा मुरनाळ यांचे आज निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार, बैलहोंगलच्या डॉ. रामण्णावर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचा देह केएलई जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व मोठा मित्रपरिवार आहे. दरम्यान, त्यांचा देह दान केल्याबद्दल डॉ. महांतेश रामण्णावर यांनी मुरनाळ कुटुंबियांचे आभार मानले.


Recent Comments