Banglore

उमरगा येथे आंदोलकांनी कर्नाटक परिवहनची बस दिली पेटवून

Share

महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मराठा आंदोलकांनी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस पेटवून दिली. ही घटना महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात घडली.

केएसआरटीसीच्या बीदर डेपोची बस क्र.केए 38 एफ 1201 बीदर जिल्ह्यातील भालकी येथून महाराष्ट्रातील पुण्याकडे जात होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे बस येताच मराठा आंदोलकांनी प्रवाशांना उतरवून बस पेटवून दिली. बसमधील सर्व 48 प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महाराष्ट्रात जाणारी बससेवा बंद केली आहे.

केकेआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक एम. राचप्पा यांनी सांगितले की, कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यानची बससेवा रात्रीपासून तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #state#karnatak#bus#fire#maharashtra