Banglore

जारकीहोळी यांच्या बेंगळुरातील घरावर डीकेशी समर्थकांनी चिकटवले अर्वाच्य पोस्टर्स

Share

रमेश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर पत्रकार परिषदेत बोचरी टीका आणि आरोप केल्याने डीकेशींचे समर्थक संतप्त झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी जारकीहोळी यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानासमोर पोस्टर्स लावून आंदोलन केले.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील युद्ध सुरूच आहे. जारकीहोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत डीके शिवकुमार यांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी रमेश जारकीहोळी यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानासमोर पोस्टरस लावून त्यांचा निषेध केला.

रमेश जारकीहोळी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत डीके शिवकुमार हे दलाल, फसवणूक करणारे, सीडी मास्टर आहेत असा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवकुमार यांच्या समर्थक कार्यकर्ते व चाहत्यांनी सदाशिवनगर येथील जारकीहोळी यांच्या घराच्या गेट व संरक्षक भिंतींवर अर्वाच्य शब्द असलेले पोस्टर चिकटवले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पोस्टर्स हटवले. शेषाद्रीपूर उपविभागाच्या एसीपीनी घटनास्थळी भेट देऊन जारकीहोळी यांच्या निवासस्थानाला सुरक्षा पुरवली.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #dkshivakumar #rameshjarkiholi #karnataka #india #politics #controversy #protest #disrespect