Hukkeri

कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून नर्सिंगच्या विद्यार्थिनींची आत्महत्या

Share

गोकाक तालुक्यातील घटप्रभा नगर येथील केएचआय नर्सिंग महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणाऱ्या गोव्यातील ऋतुजा रमेश पडलोस्कर (21) या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

सोमवारी संध्याकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे कॉलेज संपवून ऋतुजा बिल्डिंगकडे जातानाचे दृश्य सीसी कॅमेऱ्यात कैद झाले. तिने कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

इमारतीवरून काहीतरी पडल्याचा आवाज तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना ऐकू आला . त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पहिले असता ऋतुजा मृत्यूशी झुंज देत असल्याचे पाहून तिया तातडीने रुग्णालयात नेऊन उपचार केले.

मात्र उपचाराचा फायदा न झाल्याने ऋतुजाचा मृत्यू झाला.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
घटप्रभा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन , गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Suicide #Student #Building #Karnataka