सदलगा पोलिस ठाण्याचे पीएसआय शिवकुमार बिरादार यांनी एका दलित तरुणाला मारहाण केली. असा आरोप करून , या प्रकरणाची चौकशी करावी असे निवेदन चिक्कोडी तालुका दलित क्रांती सेनेतर्फे सीपीआय विश्वनाथ चौगला यांना देण्यात आले.


दलित क्रांती सेनेचे प्रदेशाध्यक्ष अशोककुमार आसुडे यांनी सांगितले की, 23 रोजी मानकापूर गावातील मिनाप्पा माने व विलास जिरगे यांच्यात मारामारी झाली होती. त्या मारामारीत माने यांची आई जयश्री या गंभीर जखमी झाल्या.

माने सदलगा पीएसआय शिवकुमार बिरादार यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले असता माने यांच्या थोबाडीत मारून शिवीगाळ करत त्यांना पोलीस स्थानकातून हाकलून दिले .. दलितांवर अन्याय करणाऱ्या पीएसआय व हवालदार यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करून तात्काळ बदली करावी, अशी विनंती केली.
यावेळी , बौद्ध मंदिर परिसरातून निषेध मोर्चा काढून पीएसआयहटाओ, दलित बचाओ’ अशी घोषणाबाजी करण्यात आली .
यावेळी सुरेश माने, ऍड . सचिन शिंदे, राहुल वराळे, ग्रा.पं.सदस्य प्रमोद शेवाळे, दादासो शेवाळे, मिलिंद कांबळे, मलकारी काळे, कविता चव्हाण, महादेवी शिंदे, बाबासाहेब कुरणी, रामचंद्र काळे, संजू कांबळे, पिंटू कांबळे आदी उपस्थित होते.


Recent Comments