सर्व जाती एकत्र आल्यानेच आज देश बलिष्ठ आणि शक्तिशाली झाला आहे असे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी सांगितले.
बेळगावात रविवारी धर्मनाथ सभागृहात राष्ट्रीय ग्रामविकास फौंडेशन, हेल्थ अँड नेचर संघटनेतर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात कर्नाटक, महाराष्ट्र व अन्य राज्यातून शिक्षण, सहकार, आरोग्य व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वीरप्पा मोईली, माजी खासदार अमरसिंग पाटील, रत्नमाला सावनूर, संपतराव बापू पवार-पाटील, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, सीमा इन्ग्रोळी, होमगार्डचे माजी कमांडंट अरविंद घट्टी, सुहास शिरोडकर, वारणा उद्योगाच्या शुभलक्ष्मी कोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित होते. यावेळी दोनशेहून अधिक लोकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना वीरप्पा मोईली यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांची दखल घेऊन राष्ट्रीय ग्रामविकास फौंडेशन, हेल्थ अँड नेचर संघटनेने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल कौतुक केले. त्याचप्रमाणे सत्कार झालेल्या मान्यवरांनी यापुढेही समाजाच्या सेवेत वाहून घ्यावे असा सल्ला दिला.
यावेळी सत्कारमूर्ती व त्यांचे कुटुंबीय, संघटनेचे सभासद, विविध राज्यातील लोक उपस्थित होते.


Recent Comments