Bailahongala

राज्योत्सवासाठी ध्वजस्तंभ लावताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Share

कर्नाटक राज्योत्सवासाठी ध्वजस्तंभ लावताना विजेच्या धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल सायंकाळी बैलहोंगल तालुक्यातील ओकुंद गावात घडली.

ध्वजाचा खांब उभारत असताना एका तरुणाचा अपघाती विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. प्रज्वल चनगौडा मुनेप्पनवर या 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. येत्या 1 नोव्हेंबर रोजी असलेल्या कर्नाटक राज्योत्सवानिमित्त ध्वजस्तंभ लावताना या तरुणाचा अपघाताने शॉक लागून मृत्यू झाला. जिल्ह्यातील

कन्नड राज्योत्सव सोहळ्याची प्रज्वलसह गावातील तरुणांनी तयारी चालवली होती. त्यासाठी ओकुन्द गावच्या बसस्थानकासमोर ध्वजस्तंभ उभारण्यात येणार होता. तेथे 1 नोव्हेंबर रोजी ध्वजारोहणाची तयारी सुरु होती. शनिवारी सायंकाळी ध्वजस्तंभाचे रोपण्याचे काम सुरु असताना तेथून गेलेल्या सर्व्हिस वायरला लोखंडी ध्वजस्तंभाचा स्पर्श झाला. त्यामुळे खांबाला धरून उभारलेल्या प्रज्वलकडे वीज प्रवाहित होऊन त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला तत्काळ उपचारांसाठी बैलहोंगल तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार निष्फळ ठरले आणि त्याचा मृत्यू झाला.

मुलगा गेल्याने प्रज्वलच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पुत्राच्या उत्कर्षाची स्वप्ने पाहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांवर आकाश कोसळल्यासारखे झाले आहे. नुकतीच अग्निवीरसाठीची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेला प्रज्वल शारीरिक परीक्षेची तयारी करत होता. नेमकी त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. त्याच्या मृतदेहाचे बैलहोंगल तालुका रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

#innews #innewsbelagavi #belgaumnews# #Bailhongal # Shock # Death