सरकारने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखल्याच्या पार्श्वभूमीवर अभाविपच्या नेतृत्वाखाली विध्यार्थ्यानी आज चिक्कोडी येथे आंदोलन करून सरकारविरोधात रोष व्यक्त केला.


चिक्कोडी शहरातील मिनीविधान सौधसमोर शेकडो विद्यार्थ्यांनी निदर्शने करून शासनाविरोधात रोष व्यक्त केला. विविध विभागामार्फत पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी अर्ज करतात.परंतु शासन शिष्यवृत्ती देत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गरीब व हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सन 2022-23 साठी स्थगित करण्यात आली आहे. शासनाने तत्काळ विद्यार्थी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी निदर्शक विध्यार्थ्यानी केली. यावेळी त्यांनी तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यामार्फत शासनाला निवेदन देऊन शिष्यवृत्ती देण्याची मागणी केली.


Recent Comments