पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वतीने 31 ऑक्टोबर रोजी, 2023-24 या वर्षासाठीच्या पीयूसी विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावात शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम. एम. कांबळे यांनी ही माहिती देऊन सांगितले की, श्री सिद्धरामेश्वर पीयूसी कॉलेज, शिवबसवनगर, बेळगाव आणि पदवीपूर्व शिक्षण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 31 रोजी बेळगावमध्ये प्रथमच पीयूसी विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार असून, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
यावेळी पदवीपूर्व शिक्षण विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments