Belagavi

बेळगावात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे आंदोलन

Share

सहा वर्षे ग्रामपंचायतींमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा पंचायतीमध्ये तयार करण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार 2022 मध्ये ग्रेड-2 आणि लेखा सहाय्यक पदांवर पदोन्नती देण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी बेळगावात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलन केले.

२०२२ मध्ये जिल्हा पंचायतीमध्ये तयार करण्यात आलेल्या सेवाज्येष्ठता यादीनुसार ग्रामपंचायतींमध्ये सहा वर्षे काम केलेल्या बिल कलेक्टर, लिपिक, लिपिक वजा संगणक परिचालक कर्मचाऱ्यांना श्रेणी-२ वर पदोन्नती देण्याचे आदेश द्यावेत. व लेखा सहाय्यक पदे व विविध मागण्यांची सरकारकडून पूर्तता करावी, या मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी बोलताना ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, सहा वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती द्यावी. कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी विचार करावा. ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान वेतन म्हणून ग्रॅच्युईटी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

#Innews #Innewsbelagavi #InnewsBelgaum #BelagaviNews #grampanchayatemployeesassociation #protest #belgavi #karnataka #workersrights