कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील दर्जेदार व अत्याधुनिक वस्त्रप्रावरणांची भव्य शोरूम अशी ख्याती अल्पावधीतच प्राप्त केलेल्या बेळगावातील बीएस चन्नाबसप्पा मॉलकडून ग्राहकांसाठी बंपर ऑफर योजना सुरु करण्यात आली आहे. या शोरूममधील दराहून कमी दरात त्याच दर्जाचे कपडे मिळत असल्याचे सिद्ध केल्यास ग्राहकांना डबल डिफरन्स देण्यात येणार आहे.
बीएस चन्नबसप्पा अँड सन्स द टेक्स्टाईल मॉलचे संचालक शेखर यांनी आज पत्रकार परिषदेत योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील ग्राहकांना कमी, माफक किमतीत अत्याधुनिक आणि आकर्षक दर्जेदार कपडे देत आहोत. आम्ही कंपनीकडून, उत्पादकांकडून थेट कमी दरात कपडे खरेदी करून आमचा नफा कमीतकमी ठेवून ग्राहकांना माफक किंमतीत दर्जेदार कपडे देतो.
ग्राहकांचा सर्वाधिक गाईड व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. काही ग्राहकांना वाटते की आमचे शोरूम मोठे आहे त्यामुळे किंमती महाग असू शकतात, म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना कमी किमतीत सर्वोत्तम दर्जाचे कपडे देत आहोत. दावणगेरेनंतर बेळगावातील आमच्या शोरुमने अल्पावधीत ग्राहकांची मने जिंकली आहेत. ग्राहकांचा आमच्या संस्थेवर विश्वास आहे. तो आणखी दृढ करण्यासाठी आम्ही नेहमी ग्राहकांसाठी फायदेशीर योजना आणतो.
दिवाळीनिमित्त आम्ही ग्राहकांसाठी बंपर योजना आणली आहे. यात आम्ही जितक्या कमी किमतीत दर्जेदार कपडे देतो तेच कपडे आमच्या किमतीहून कमी बाहेर कुठेही आणले तर आम्ही त्यांना दुप्पट पैसे देऊ. नुकताच या योजनेला प्रारंभ झाला असून, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. उलट काही ग्राहकांनी तुम्ही आधीच इतक्या कमी किंमतीत दर्जेदार कपडे देता, मग ही योजना का आणली असे विचारले. परंतु ग्राहकांचा अधिकाधिक फायदा व्हावा या हेतूने आम्ही ही योजना सुरु केली आहे. त्याचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षी एप्रिलपर्यंत किंवा कायमस्वरूपी ही योजना सुरु ठेवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ग्राहक विशेषतः महिला चोखंदळपणे कपडे खरेदी करतात. त्याला उशीरही लागू शकतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात ग्राहकांना दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत अशी सूचना आली आहे. त्यानुसार,बेंगळूरच्या अडिगा या संस्थेच्या ‘पाकशाला’ या साखळी रेस्टॉरंट्सची शाखा आमच्या मॉलमध्ये सुरु करण्यासंदर्भात बोलणी सुरु आहेत. सर्व काही जुळून आल्यास लवकरच येथे त्यांचे रेस्टॉरंट्स सुरु करण्यात येईल असे शेखर यांनी सांगितले.
आमच्या दुकानात येऊन कपडे खरेदी करणारे ग्राहक कष्टाळू आणि घाम गाळणारे लोक आहेत. त्यांना त्यांच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य कपडे देण्याची आमची इच्छा आहे. ग्राहकांच्या फायद्यासाठी कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या कपड्यांसाठी ही हमी योजना देण्याचा आमचा संकल्प आहे.
यावेळी वेद बंकापुरे यांच्यासह स्टोअरचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments