महानवमीनिमित्त सोमवारी हिरेबागेवाडीजवळील पावनक्षेत्र बडेकोळ्ळ मठ येथे चंडिका होमचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभागी होऊन पूजन केले.
बडेकोळ्ळ मठातील महानवमीनिमित्त आयोजित चंडिका होममध्ये सहभागी झालेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्याच्या व जनतेच्या समृद्धीसाठी प्रार्थना करून शिवयोगी नागेंद्र महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, स्थानिक नेते व भक्तमंडळी उपस्थित होते.


Recent Comments