Vijayapura

सरकारने शेत रस्त्याचा प्रश्न सोडवल्याने संघटनेने मानले जिल्हा प्रशासनाचे आभार

Share

शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने , रस्त्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस हाल होत असल्याचे लक्षात येताच आमच्या संघटनेने अनेकदा शासनाच्या निदर्शनास आणून देऊन लढा दिला आहे.सरकारने आमची अडचण ओळखून त्या अधिकाऱ्याना सोडविण्याचे काम दिले आहे. अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेचे राज्य सचिव अरविंद कुलकर्णी यांनी शासनाचे याबद्दल अभिनंदन केले आहे.

त्यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी टी.बुभलन व जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनावणे याना मिठाई देऊन चर्चा केली आणि अखेर शासनाला जाग आली असून रस्त्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात आल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून शेतांकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर 2023 ला आदेश जारी करून तहसीलदारांना रस्ते पक्के करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. .

विजयपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पी. सुनीला कुमार, आणि आता महसूल विभागाचे आयुक्त डॉ. विजय महंतेश दानम्मा यांनी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि सत्ताधारी सरकारने आदेश हा जारी केला. त्या अनुषंगाने आमचा लढा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या इलेकट्रॉनिक मीडिया व पत्रकार संघाचे अभिनंदन केले.

यावेळी विठ्ठल बिरादार , चन्नबसप्पा सिंदुर, बाळप्पागौडा लिंगदल्ली, संगनगौडा कोलुर, प्रल्हाद नागराळ , बसवराज जंगमशेट्टी, गुरू कोट्याल, संगप्पा नायकोडी, होनकेरप्पा तेलगी, गुरुलिंगप्पा पडसलगी, एरन्ना देवरबागुड, गोटगुणकी, श्रीशैल शासनुराशरण बिरादार , परमानंद पुजारी आदी उपस्थित होते.

Tags: