जय नगर, बेळगाव येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ आज खासदार श्रीमती मंगल अंगडी यांच्याहस्ते नवीन पथदिवे बसवण्यात आले.
हिंडलगा मार्गावरील जयनगर येथे पथदीप बसविण्याची नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्याची दखल घेऊन बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके आणि खासदार श्रीमती मंगल अंगडी यांनी मंजुरी दिली होती. त्यांच्या निधीतून मंजूर झालेल्या पथदीपांची उभारणी आज पूजन करून करण्यात आली.

या कामासाठी नगरसेविका श्रीमती वीणा विजापुरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी इन न्यूजला याबाबत माहिती देताना सांगितले की, जयनगरमधील रहिवाशांनी येथे पथदीप उभारण्याची मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करून माजी आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगल अंगडी यांनी त्वरीत निधी मंजूर केला. त्यातून आज येथे हायमास्ट दिवा बसविण्यात आला आहे.
यावेळी भाजपचे ब्लॉक अध्यक्ष अशोक थोरात, राज्य कार्यकारिणी एससी मोर्चा सदस्य पृथ्वी सिंह, भाजप बूथ अध्यक्ष डॉ. गवीमठ, सरोजिनी, तसेच सर्व जय नगरवासीय उपस्थित होते.


Recent Comments