Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा नवरात्रोत्सवात सहभाग

Share

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शनिवारी सायंकाळी हिंडलगा गावातील विजयनगर येथील रहिवाशांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवात सहभागी होऊन नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा मातेचे पूजन केले.

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील जनतेशी नाळ राखून असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मतदार संघातील स्थानिक कार्यक्रमात नेहमीच भाग घेतात. शनिवारी त्यांनी विजयनगर हिंडलगा येथील श्री माऊली नवरात्रोत्सव मंडळातर्फे आयोजित दुर्गापूजा उत्सवात भाग घेऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी

श्री माऊली मंडळातर्फे मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्थानिक रहिवासी, प्रदीप रायगोळ, प्रथमेश मुचंडी, आशुतोष कांबळे, श्री माऊली मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Tags: