हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाटक आणि पोवाड्यांच्या कार्यक्रमाने बसवण कुडची गावात वीरश्री संचारली.

मार्तंड युवा संघ, मेन रोड, बसवण कुडची यांच्या तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंडलगा येथील शाहीर वेंकटेश देवगेकर यांचा पोवाडा कार्यक्रम आणी शिवचरित्रावर नाटक कार्यक्रम शनिवार दि. 21 रोजी रात्री आयोजित केला होता.
प्रारंभी माजी आमदार अनिल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा केली. उपमहापौर रेश्मा पाटील यांनी दुर्गामाता प्रतिमेची पूजा केली. नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी श्रीफळ वाढवला. मार्तंड युवा संघातर्फे पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हिंडलगा येथील शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यासाठीच्या युद्धमोहिमांचे वर्णन करणारे वीररसयुक्त पोवाडे सादर केले. त्यामुळे उपस्थितांच्या अंगात वीरश्री संचारली. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेक आणि शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोग मार्तंड युवा संघांच्या युवक-युवतीनी सादर केला.
यावेळी राजू हिरेमठ, गजानन मुचंडीकर, अवंतिका सावकार यांचा ही मंडळाने विशेष सत्कार केला. यावेळी परशराम बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, मल्लाप्पा बेडका, जोतिबा मुतगेकर, नामदेव जैनोजी, नामदेव मुतगेकर, राजू कलेकणावर, निळकंठ हिरेमठ, सुनील दिवटे, बसू तारिहाळकर, बसवंत भातकांडे, लक्ष्मी पाटील, प्रतिभा धर्मोजी, माधुरी बेडका व मंडळाचे कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेश इटगेकर यांनी केले, जोतिबा मुतगेकर यांनी आभार मानले. मार्तंड युवा संघांचे अध्यक्ष आनंद दिवटे आणी उपाध्यक्ष शिवाजी बेडका यांनी कार्यकर्त्यांबरोबर मिळून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाला गावातील सर्व मंडळांचे सदस्य, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments