बेळगाव शहरातील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर शनिवारी पोलीस शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशवासीयांच्या रक्षणासाठी सेवाकाळात प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्मा पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रारंभी बेळगावचे पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर आणि इतर अधिकाऱ्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्टचक्र वाहून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. प्रसारमाध्यमांतर्फे इन न्यूजचे प्रतिनिधी सुबानी मुल्ला यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली.
बेळगावचे पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी देशभरातील शहीद पोलिस अधिकारी व शिपायांच्या नावांची यादी जाहीर करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, 1959 मध्ये भारताच्या सीमेवर असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लडाख भागात चिनी लोकांनी हल्ला करून 189 भारतीय पोलीस मारले. भारतीय सीआरपीएफ कमांडर करम सिंग यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने वीर मरण पत्करले, त्यांच्या स्मरणार्थ लडाखमध्ये पोलीस हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद दिन साजरा केला जातो. या लढ्यात भारतातील 189 पोलीस आणि कर्नाटकातील 16 पोलीस शहीद झाल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या निष्ठेमुळे समाजातील प्रत्येकाला शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगता आले आहे, असे ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, डीसीपी रोहन जगदीश, डीसीपी स्नेहा, तसेच पोलीस कर्मचारी नगरसेवक बाबाजान मतवाले, माजी नगरसेविका जयश्री माळगी, विकास कलघटगी अलमास मतवाले, पोलीस शहीद दिन सोहळ्यात उपस्थित होते.


Recent Comments