मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुलांच्या हक्कांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले पाहिजे. असे कर्नाटक राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य शेखर गौडा रमतनाळ म्हणाले .
धारवाड जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा पोलीस विभाग, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, समाजकल्याण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली.
आज मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे. राज्य आणि केंद्र सरकारने मुलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे केले आहेत. परंतु अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये काळजी, आणि बांधिलकी असायला हवी.


Recent Comments